भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे

anik vadyen tethen vajatati apar | uthavale bhar vaishnavanche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥ चिद्रत्नमंडप दिसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥ नक्षत्र गोंधळ उसळती भारी । चक्रें त्याजवरी उल्लाळती ॥३॥ मोतियें तोरणें लाविलीं अपार । झळकती तारे विभु ऐसे ॥४॥ नामा म्हणे देवा नवल केलें गहन । पुजाळिलें गगन ज्ञानदेवें ॥५॥