भजनी मालिका

भजने

पापांचे पर्वत मोठे झाले । शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥ जन्मांतरीं केलें अवघें व्यर्थ गेलें । देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

पापाचें संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥१॥ सुख अथवा दु:ख भोगणें देहासी । सोस वासनेसी वा-उगाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पापासवें जिणें ज्याचें । वृथाचि त्याचें झालेपण ॥१॥ भोगितां भोग रडे मग । म्हणे मी जगनिंदय झालों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पापिया चांडाळा हरीकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥१॥ ब्राम्हणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पापिष्टाचें जिणें काय ते जिवालें । गळां स्तन झाले शेळियेचे ॥१॥ येथेंचि जो खोटा तेथें तो करंटा । व्यर्थ आला पोटा माउलीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झालें ओझें त्यांचें ॥१॥ दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पापी म्हणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥१॥ ऐशा विचाराने घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाप्या नावडे संतसंगति । लोभिया नावडे उदारवृति । व्व्यभिचारिणी नावडे पति । नावडे ज्योति उजियेडा ॥१॥ चांदणें नाचडे तया चोरां । सावधान नावडे तया हेरां । सद्‍बुद्धि नावडे रांडपोरा । सत्य कुचरां आवडेना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पाया शोधोनियां बांधिताती घर । ऐसें या दुस्तर नरदेहीं ॥१॥ म्हणती पुत्र माझे नातु हें कलत्र । मिळती सर्व गोत्र तये ठाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ