भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाहीं कोण्हा

papachi vasti jana | pandharisi nahin konha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पापाची वस्ती जाणा । पंढरीसी नाहीं कोण्हा ॥१॥ अवघे भाग्याचे सदैव । तेथें वसे विठ्ठल देव ॥२॥ माहेर भाविका । देखिलीया पुडलिका ॥३॥ जनार्दनाचा एका म्हणे । पंढरी पेणें सुखवस्ती ॥४॥