भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं

payan padaven hen majhen bhandaval | sarati he bol kothen payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥ काय उणें तुम्हां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥ तुका म्हणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं ॥३॥