भजनी मालिका
← भजनांकडे परत

पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झालें ओझें त्यांचें

papi je abhakta daitya te majale | dharanisin jhalen ojhen tyanchen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झालें ओझें त्यांचें ॥१॥ दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥ राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन । पळाले ब्राह्मण दैत्यां भेणें ॥३॥ वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥ बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोस-वेना भार मज आतां ॥५॥ ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशीं ॥६॥ नामा म्हणे आताम करितील स्तुती । सावधान चित्तीं परिसावें ॥७॥