भजनी मालिका

भजने

परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृष्टी केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परमर्थीं राखितां भावो नवल नव्हे पहाहो । भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥ कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त । अहर्निशीं स्वयें पाळिती निजभक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरी मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

परमामृत सागरु मथुनियां पुरता । काढिला तत्त्वतां ज्ञानबोधु ॥१॥ या सुखाचा पारु जाणते विरळे । घेताती गळाळे संतजन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परमार्थ सोयरा अहोरात्र करीं । गाई निरंतरी रामकृष्ण ॥१॥ नरदेहा यातना चुकतील फेरे । वायां हावभरी होऊं नको ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परलोकींचा सखाक उभा विटेवरी । भक्त साहाकारी पांडुरंग ॥१॥ चंद्रभागे तटी शोभे वाळूवंटीं । देखिलासे दृष्टी पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परळी वैजनाथीं जगमित्र नागा । ध्यानीं पांडुरंगा आठवीत ॥१॥ सर्वांभूतीं त्यासी दिसे वासुदेव । नाहीं दुजाभाव त्याचे मनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परस्परें गुह्य करिती भाषण । म्हणती महाधन गांवा आला ॥१॥ रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार । नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परा पश्यंति मध्यमा वैखरी । ते गाय दुभे वैष्णवा घरीं ॥१॥ ते एके विठ्ठलें पंढरी राखिली । दुभावया दिधली पुंडलिका ॥२॥

रचनाकार: संत नामदेव