भजनी मालिका
← भजनांकडे परत

परम सुखाचा सुकाळ । चित्तीं वसे सर्वही काळ

param sukhacha sukal | chittin vase sarvahi kal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
परम सुखाचा सुकाळ । चित्तीं वसे सर्वही काळ ॥१॥ ऐसें केले कृपादान । तुम्हीं मनातें मोहुन ॥२॥ जिवा पैलाडिये खुणे । पावविलें सामथ्यें गुणें ॥३॥ निळा म्हणे ऐसे किती । उपकार वानूं पुढतोपुढतीं ॥४॥