भजनी मालिका
← भजनांकडे परत

परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता

parastriten mhanatan mata | chitta lajaviten chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परस्त्रीतें म्हणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥१॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥ धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्ट्या हाते नुडवी काग ॥२॥ जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥३॥ बोले तैसा चाले । तुका म्हणे तो अमोल ॥४॥