भजनी मालिका
← भजनांकडे परत

परस्परें गुह्य करिती भाषण म्हणती

parasparen guhya kariti bhashan mhanati

परस्परें गुह्य करिती भाषण म्हणती । महाधन गांवा आला ॥१॥ रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार । नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥ प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणें । दीप त्रिभुवनीं एक जाला ॥३॥ निवृत्तिदेव म्हणे कुलालाचे चक्र । अंतर बाहेर एक ऐसें जालें ॥४॥