भजनी मालिका

भजने

पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पंधरा भागले सोळांसी न कळे । सतरा वेडावले न कळे माय ॥१॥ एकुणवीस भले विसांतें पुसती । तयांसी ती गति न कळे गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परउपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया॥१॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडी॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनियां भजन हरिचें करा ॥१॥ सर्वांभूती कृपा संतांची संगति । मग नाहीं पुन-रावृत्ति जन्ममरण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हें वासना माया केली ॥१॥ तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देईं तुझ्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परधन कामिनी समूळ नाणीं मना नाहीं हे वासना माया केली ॥१॥ तृष्णाहेअधमनव्हावीमजला । प्रेमाचाजिव्हाळादेईतुझ्या||२||

रचनाकार: संत जनाबाई

परपश्यंती मध्यमा वेगळा । वैखरीये निराळा शिव जाणा ॥१॥ आदि मध्य अंत न कळे रुपाचा । परता चहूं वांचा शिव जाणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परपीडक तो आम्हां दावेदार । विश्वीं विश्वंभर म्हणऊनि ॥१॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम