भजनी मालिका
← भजनांकडे परत

परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य

paradravyaparanaricha abhilas | tethuni rhas sarvabhagya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परद्रव्यपरनारीचा अभिलास । तेथूनि ऱ्हास सर्वभाग्य ॥१॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥२॥ तुका म्हणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥३॥