भजनी मालिका
← भजनांकडे परत

परद्रव्य परनारी । अभिलासूनि नाक धरी

paradravya paranari | abhilasuni nak dhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परद्रव्य परनारी । अभिलासूनि नाक धरी ॥१॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥ सोवळ्याची स्फीती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥२॥ तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥