भजनी मालिका
← भजनांकडे परत

परदींपींहुनि सूक्ष्म मार्गे

paradimpinhuni sukshma marge

परदींपींहुनि सूक्ष्म मार्गे । आलासी पवन वेगें । विंदुनिया । नवमासवरि पेणें केलें मातापुरीं । सोहं सोहं परी । परतेसिना ॥१॥ निर्लज्जारे तुज शिकवूं किती । न गमे दिनराती बळिया देवो ॥२॥ त्या येउनियां वाटा तुज ऐसें गमलें । कोहं कोहं ठेले प्रकाशत । पुसुनीयां तळ वरी सूदलासी मळ घोरीं । क्षुधा आड उरीं आदळली ॥३॥ ऐशीं बाळपणीं सांकडीं । बहु ठेली झडाडी । सडाडां वोसंडी । शांति सैरा । तरुण्याचेंनि भरें वित्तविषयचोरें । बांधिलासि संसारें । हालों नेदिती ॥४॥ ऐसा वोस मार्ग पुढें अवघा वेळु पाहला । वारितां वारिता निघाला मारिजसी । पुढें पडलिसे वाट । ते ऐकरे बोभाट । परतले घायवट अर्धजीवें ॥५॥ ऐसे पायळ पुढें गेले पांगूळ मागें ठेले पैल तीर पावले परम तत्त्वेंसी । बापरखुमादेविवरु । विठ्ठ्लु सैरारे सावधु । ज्ञानिया प्रसिध्दु उपदेशितु ॥६॥