भजनी मालिका
← भजनांकडे परत

परउपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया

paraupakaren kayavachaman | vechi sudarshan rakshi taya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परउपकारें कायावाचामन । वेची सुदर्शन रक्षी तया॥१॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडी॥ध्रु.॥ परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥२॥ तुका म्हणे अंबॠषी दुर्योधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥३॥