भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार

pandharan divasan ek ekadashi | kan re na karisi vratasar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥ स्वहित कारण मानवेल जन । हरीकथा पूजन वैष्णवांचें ॥२॥ थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥३॥ तुका म्हणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥४॥