भजनी मालिका

भजने

आकाशापासोनी वायु झाला । तो गगनावेगळा नाहीं गेला ॥१॥ अग्नीपासुनी जळाचा अंशु । जळापासुनी पृथ्वीप्रकाशु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव ॥१॥ शुद्धभावें इच्छी ज्ञानदेव भेटी । येई उठाउठी भेटूं त्यासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥ अखंडित शुद्ध असावें अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आक्रोशें ध्यानासी आणी पुरुषोत्तमा। पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ।।१।। अखंडित शुद्ध असावें अंतर। लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

आगमी निगमीं पाहतां तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हां तो सुगमीं ॥१॥ नवचे वाचे बोल बोला तो वेगळा । व्यापुनी ब्रह्मांडी आहे तो उगला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आगरींचे क्षीर सागरीं पैल डोंगरी दुभते गायरे । दोहों जाणे त्याचे दुभतें जेवित्याची मेलि मायरे ॥१॥

आंगा आणुनि वारें पोरा घालिसि हमामा । निघोनियां जाईल पुढें पडासे येऊनि दमा ॥१॥ घुमे एक्याभावें । हा गोपाळ घेउनि सवें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आंगीचिया बळें खेळसी हुतुतु । वृद्धपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥ कासया खेळसी वायां भजें गुरुराया । चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आंगुलींवरी आंगुली । खेळतसे तान्हुली । पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही ॥१॥ दिवसांचें पाहणें । पाहतां दिसे लाजिरवाणें । खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ