भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाश हें असें माझें शिर बापा

akash hen asen majhen shir bapa

आकाश हें असें माझें शिर बापा । कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥ आधारापासूनी सहस्त्रदळावरी । नि:शब्द निरंतरी नारी एक ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथें । तोचि जीवन्मुक्त संत योगी ॥३॥