भजनी मालिका
← भजनांकडे परत

आगमीं नाम निगमीं नाम । पुराणीं नाम केशवाचें

agamin nam nigamin nam | puranin nam keshavachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आगमीं नाम निगमीं नाम । पुराणीं नाम केशवाचें ॥१॥ अर्थी नाम पदीं नाम । धृपदीं नाम त्या केशवाचें ॥२॥ अनु-भवे भावें कपटें प्रपंचें । परि हरीचें नाम देऊं दे वाचे ॥३॥ नाम व्हावें नाम व्हावें । नाम व्हावें त्या केशवाचें ॥४॥ ऐसें नाम बहु सुंदर । मानीं तरले लहान थोर ॥५॥ नामा म्हणे अंतर । पडों नेदीं याउपर ॥६॥