भजनी मालिका
← भजनांकडे परत

आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी

akroshen dhyanasin ani purushottama | pruthviyesi kshama uni ani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥ अखंडित शुद्ध असावें अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥ बोलें तें वचन बहु हळुवट । सुमना अंगीं दाट जडभार ॥३॥ नाम तें स्मरण अमृतसंजिवनी । म्हणे दासी जनी हेंचि करा ॥४॥