भजनी मालिका
← भजनांकडे परत

आगमी निगमीं पाहतां तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हां तो सुगमीं

agami nigamin pahatan to sugamin | vedadikan durlabh amhan to sugamin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आगमी निगमीं पाहतां तो सुगमीं । वेदादिकां दुर्लभ आम्हां तो सुगमीं ॥१॥ नवचे वाचे बोल बोला तो वेगळा । व्यापुनी ब्रह्मांडी आहे तो उगला ॥२॥ सार मथिल कोढोनि चैत्यन्य गाभा । पाहतां दिसे त्याची अनुपभ्य शोभा ॥३॥ सांकडे नव्हें भेटी जातां लवलाहे । उभारुनि बाह्मा आलिंगी लाहे ॥४॥ एका जनार्दनीं सर्व सारांचे सार । उभा विटेवरे परब्रह्मा निर्धार ॥५॥