भजनी मालिका

भजने

दामोदर गावा दामोदर पहावा । दामोदर सांठवा हृदयमाजीं ॥१॥ गोपीराजी ध्यान दामोदरीं मन । चुकलें बंधन नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥ विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज ॥१॥ दावी उग्र तप केले उपवास । फिरतांही देश काय काज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दास जालों हरीदासांचा । बुद्धीकायामनेंवाचा ॥१॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंग कल्लोळ । नासे दुष्टबुद्धी सकळ । समाधि हरीकीर्त्तनीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा ॥१॥ सोशिले प्रवास जन्मजन्मांतर । करिसी अव्हेर आम्हांलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं ॥१॥ गाईन तुमचएं नाम संतांचा सांगात । यापरती मात दुजी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥१॥ पडतां संकटीं द्रौपदी बहीण । धांवे नारायन लावलाहें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥१॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम