भजनी मालिका
← भजनांकडे परत

दास्य करुं हरिदासाचें । तेणें जन्माचें सार्थक

dasya karun haridasachen | tenen janmachen sarthak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दास्य करुं हरिदासाचें । तेणें जन्माचें सार्थक ॥१॥ बुद्धि वसो तुमचे नामीं । आणिका कामीं न गुंतो ॥२॥ संसार तो पारिखा जाहला । या विठ्ठला पाहतां ॥३॥ पालटला भेदाभेद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥