भजनी मालिका
← भजनांकडे परत

दास्यत्व करीन मी देवा । माझी पुरवा आस तुम्ही

dasyatva karin mi deva | majhi purava as tumhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दास्यत्व करीन मी देवा । माझी पुरवा आस तुम्ही ॥१॥ देऊनियां कृपादान । निरवावें जाण संतांसी ॥२॥ मग ते धरितां आपुलें करीं । होती कामारी भुक्ति मुक्ति ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तुमचें महिमान न कळे ॥४॥