भजनी मालिका
← भजनांकडे परत

दास्यत्वें चोखट । रामनामें सोपीं वाट

dasyatven chokhat | ramanamen sopin vat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दास्यत्वें चोखट । रामनामें सोपीं वाट ॥१॥ करितां लाधलें चरण । मना जाहलें समाधान ॥२॥ होतों जन्मोजन्मीं तापलों । तुमचे दरुशनें निवांत ठेलों ॥३॥ शरण एका जनार्दनीं । जनार्दन एकपणीं ॥४॥