भजनी मालिका

भजने

तंव अणिमादि सिद्धि उभ्या महाद्वारीम । तिहीं सर्व सामोग्री सिद्ध केली ॥१॥ सडासंमार्जनें गुढिया तोरणें । शृंगारिलीं भुवनें परिचारिकीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव अध्यात्मिक पंडित अग्निहोत्री । एक म्हणविती श्रीत्री सदाचार ॥१॥ आम्हांसी तें नाहीं तुमचें स्वरुपज्ञान । अपूर्व दर्शन देखिलें आजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव आली वार्षिक यात्रा । करणें इंद्रपूजा सर्वत्रां । गोरसें काढुनी कावडी भरा । हाकारी तराळ नंदआज्ञा ॥१॥ जाऊनियां पर्वतासी । सुरपती पुजावा प्रतिवरुषीं । जागोनियां त्याची दिवसासी । निदसुरियां देती आठव ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव कृष्ण म्हणे बळिरामदेवा । आमुचाही वांटा कांही ठेवा । ते म्हणती यावरी अवघा । तुमचाचि भाग निश्रिचतार्थे ॥१॥ कुळवई आणि राजा कंस । अर्थार्थी हे दिधले तुम्हास । कृष्णजी म्हणती हें नये चित्तास । यांतहि वाटा पाहिजे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ । करीत वेदघोश कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें ॥१॥ ब्रम्हा म्हणे हें नवल झालें । ते तेथिल येथें हे कोठूनि आले । चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान श्रीहरिंचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव ते आधिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ । हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती व्दिविध कैसेनि हे झालें ॥१॥ तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी । सुखें पिऊं देती स्तनीं । आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तंव ते आवडते भक्त अंतरंग आपुले । देवं बोलाविलें एकांतासी ॥१॥ म्हणे ह्या नाम्यापरतें मज दुजें नावडे । सांगे तयापुढें केशीराजु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव ते जगन्माता म्हणे जी कृपावंता । कर्ता करविता कोण याचा ॥१॥ हा तुमचा दास आहे अंतरंग । काय या उद्वेग करणें असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव ते भाग्याचे सागर विनविती द्विजवर । म्हणती तूं माहेर जोडलासी ॥१॥ चरणींचा वियोग न व्हावा सर्वथा । तोडावी ममता प्रपंचाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥ सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी वो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तंव ते सकळ आले शीघ्रवत । आनंदें गर्जत नामघोषें ॥१॥ प्रेमें उचंबळत अंतरीं बोधले । सप्रेंमे लोटले चरणांवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तंव तेथें नवल वर्तलें । आकाश असे विमानीं दाटलें । म्हणती मूळपीठ वैकुंठ देखिलें । पुंडलिकासगट ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

तंव तो हरी म्हणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥१॥ पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देई भ्रांति करीं स्थिर बुद्धि वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुद्धि वो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम