भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव ते आधिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ । हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती व्दिविध कैसेनि हे झालें

tanv te adhile magile gopal | sarikhenchi dhairya virya pratap bal | hen dekhoniyan vismit sakal | mhanati vdividh kaiseni he jhalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव ते आधिले मागिले गोपाळ । सारिखेंचि धैर्य वीर्य प्रताप बळ । हें देखोनियां विस्मित सकळ । म्हणती व्दिविध कैसेनि हे झालें ॥१॥ तैसेचि वत्सें दोनी दोनी । एकएक गाईलागुनी । सुखें पिऊं देती स्तनीं । आणि दुभती वोरसोनी यथेष्ट ॥२॥ तंव ते असमाई गोठी । होतीं अघासुराचे पोटीं । तेचि सांगती वडिला वोटीं म्हणती नवल वितलें ॥३॥ आणि आम्हां अवघिया वनीं । घातलें होतें सर्पे वदनीं । मागें होता सारंगपाणी । तेणें तो चिरुनी टाकिला ॥४॥ मग वत्सें आणि गोवळ । आम्ही बाहेरी पडिलों सकळ । त्याचे पहाहो करवाळ । रक्तें पूर वाहती ॥५॥ नवल तें ऐकोनि कानीं । लोक चालिले पहावया नयनीं । तंव ते पडिले वाळोनी । गंगाओघा सारिखें ॥६॥ ये गोष्टीसी झालें वर्ष । गोवळांवाटे एकचि निमिष । निळा म्हणे सेविलें शेष । तेणें सर्वदा समाधी ॥७॥