भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव अंतरिक्ष गगनीं । अवचिती जाली वाणी

tanv antariksha gaganin | avachiti jali vani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तंव अंतरिक्ष गगनीं । अवचिती जाली वाणी । भक्त तरतील मेदिनी । ज्ञानदेव दरुषणें ॥१॥ ऐसी खवाणी वदली । जयजयकारें टाळी पिटली । तंव स्नानासंध्या सारिली । देवभक्तीं सकळिकीं ॥२॥ धन्य धन्य वृक्ष अजान । धन्य धन्य सिद्धेश्वरस्थान । ज्ञानदेवा समाधान । धन्य आळंकापुरी ॥३॥ मग पाहोनियां शुभदिन । देवेम करुं आदरिलें प्रयाण । नामा होतसे खेदक्षीण । ज्ञानदेवाकारणें ॥४॥