भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव कृष्ण म्हणे बळिरामदेवा । आमुचाही वांटा कांही ठेवा । ते म्हणती यावरी अवघा । तुमचाचि भाग निश्रिचतार्थे

tanv krushna mhane baliramadeva | amuchahi vanta kanhi theva | te mhanati yavari avagha | tumachachi bhag nishrichatarthe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तंव कृष्ण म्हणे बळिरामदेवा । आमुचाही वांटा कांही ठेवा । ते म्हणती यावरी अवघा । तुमचाचि भाग निश्रिचतार्थे ॥१॥ कुळवई आणि राजा कंस । अर्थार्थी हे दिधले तुम्हास । कृष्णजी म्हणती हें नये चित्तास । यांतहि वाटा पाहिजे ॥२॥ बरें म्हणोनियां बळिराम । यांतहि घ्या हो निमेनिम । मग मिसळले जेंवि निरसावया तम । चंद्रसूर्य पौर्णिमेचे ॥३॥ तेथें झाला हाहा:कार । घ्या घ्या शब्द उठिला थोर । कृष्ण नेटका झुंजार । आणि बळिरामहि महाबळी ॥४॥ करुनियां मल्लां महामारी । निर्दाळिले एका निमिषावरी । तंव तो कुळवई लोटिला निशाचरीं । कृष्णें सोंडेसीचि धरियला ॥५॥ आसडूनियां तो महीवरी । उपटूनि दांत घेतले करीं । ठोकिता तेणेंचि मस्तकावरी । ठिकरिया केली गंडस्थळें ॥६॥ निळा म्हणे बळियाबळि । माजी ब्रम्हांडा एक वनमाळी । यापरी करुनियां रवंदळी । निर्दाळिले असुर ॥७॥