भजनी मालिका

भजने

झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐकें परीक्षिती अद्‍भुत हें ॥१॥ निद्रेनें व्यापिलें शौनकारे सर्वां । लागला वणवा तया स्थानीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

झाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥१॥ येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

झाला नामपाठ झाला नामपाठ । मोक्षमार्ग वाट सोपी झाली ॥१॥ आवडी आदरें नामपाठ गाये । हरिकृपा होय तयावारी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

झाला विरह अंतरी कामिनीसी । न ये सांगतां बोलतां कोणापासी । मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कापे तेणें झाली कासाविसी वो ॥१॥ हदई आठवे रीरंगसावळा । मनचि गुंतलें तयापासिं डोळा । कोण आणिल वो तया याचि वेळा । दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

झाला विरह हे नये देहावरी । देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथें थोरी । नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥ आण वेगिरी तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नदाचा कुमर । तया भेटतांचि होईल उतार । पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

झालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक कांही देवा न लगे दुजें ॥१॥ प्रारब्धा अधीन अन्न अच्छादन । स्थिर करोनी मन ठेवी पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥ मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

झाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी पाई ॥१॥ उठा पांडुरंगा उशीर झाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम