भजनी मालिका

भजने

गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥ झालें काय ऐसें न कळे कोणासी । म्हणती तुम्हांपासीं देव होता ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

गोपाळाशीं खेळती । आनंदें डोलती । कृष्ण आमुचा सांगाती । डो डो डो डो डो ॥१॥ कान्होबाची संगती । ब्रम्हादिक इच्छिती । धन्य आम्हां म्हणविती । अ ल ल ल ल ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥ सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपिका ह्मणती यशोदा सुंदरी । करितो मुरारी खोदी बहु ॥१॥ यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोपिकेचा मेळा आला गृहाप्रती । काय त्या ह्मणती नंदालागीं ॥१॥ परब्रह्म साक्षात्‍ क्षीरसागरवासी । त्या कैसा धा-डसी वनामध्यें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥ करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपीगोप तेथें पातलीं त्वरित । हांसतीं समस्त देखो-नियां ॥१॥ कृष्ण ह्मणे कैसी बांधिसी मजला । बांधिलें तुजला भगवंतें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोपीचंदन मुद्रा धारणें । आम्हां लेणें वैष्णवां ॥१॥ मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोपीनें घृतासीं चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंत-र्यामीं ॥१॥ सेजे घरीं होतें ठेविलें चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोमटया बीजाचीं फळें ही गोमटीं । वाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥ जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोमटीं गोजिरी पाउलें साजिरीं । कटी मिरविली करें दोन्हीं ॥१॥ वामभागी शोभे भीमकतनया । राही सत्यभामा या जीवलगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोमटें गोजिरें पाउलें साजिरें । धरियेलीं गोजिरीं विटेवरी ॥१॥ वेध तो तयाचा मनें कायावाचा । दुजा छंद साचा नाही मना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा ॥१॥ रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणीं धाय मनास तया पाहतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोमुखीं गोवूनि काय जपतोसी । जपतप त्यासी विघ्न करी ॥१॥ नामसंकीर्तनें जळतील पापें । चुकतील खेपा चौर्‍यांशींच्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें ॥१॥ गहिनीनें निवृत्तिनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम