भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपीनें घृतासीं चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंत-र्यामीं

gopinen ghrutasin choroni thevilen | devasi kalalen ant-ryamin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोपीनें घृतासीं चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंत-र्यामीं ॥१॥ सेजे घरीं होतें ठेविलें चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथें ॥२॥ आज्य घेऊनियां गोपाळांसी देत । आपन भक्षीत प्रेमानंदें ॥३॥ तृप्त होवोनियां गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केलें त्याच्या ॥४॥ नामा ह्मणे ऐसा वैकुंठनायक । दावीत कौतुक नानापरी ॥५॥