भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोमुखीं गोवूनि काय जपतोसी । जपतप त्यासी विघ्न करी

gomukhin govuni kay japatosi | japatap tyasi vighna kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोमुखीं गोवूनि काय जपतोसी । जपतप त्यासी विघ्न करी ॥१॥ नामसंकीर्तनें जळतील पापें । चुकतील खेपा चौर्‍यांशींच्या ॥२॥ उपवास करी उग्र अनुष्ठानी । तया चक्रपाणी अंतरतो ॥३॥ नामा ह्मणे ऐसे बहुतेक प्राणी । पचतील खाणी भ्रष्टलोक ॥४॥