भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळाशीं खेळती । आनंदें डोलती । कृष्ण आमुचा सांगाती । डो डो डो डो डो

gopalashin khelati | ananden dolati | krushna amucha sangati | do do do do do

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गोपाळाशीं खेळती । आनंदें डोलती । कृष्ण आमुचा सांगाती । डो डो डो डो डो ॥१॥ कान्होबाची संगती । ब्रम्हादिक इच्छिती । धन्य आम्हां म्हणविती । अ ल ल ल ल ॥२॥ कृष्णाप्रती गोपाळ । म्हणताती सकळ । अकळशी नाकळ । हा त त त त ॥३॥ मामा मारूं गेलासी । आपटिलें गजाशी । मल्लयुद्ध खेळलासी । हु तु तु तु तु ॥४॥ अजगर मारिला । वडवानळ गिळिला । गोवर्धन उचलिला । अ ब ब ब ब ॥५॥ पूतनेसी शोषिलें । नारदासी । मोहिलें । गाणिकेसी उद्धरिलें । अ रे रे रे रे ॥६॥ गौळियांचे घरां जाशीं । दहीं दुध लोणी खाशी । त्यांच्या सुना भोगिसी । छि छी छी छी छी ॥७॥ सोळा सह्स्र भोगिशी । ब्रम्हचारी म्हणविशी । लटिकेंचि ठकविशी । कु लु लु लु लु ॥८॥ सोडूनियां मीपण । आम्हां घाली लोटंगण । परब्रम्हा नारायण । आ हा हा हा हा ॥९॥ ऐसे तुझे पवाडे । वर्णिताती वाडेंकोडं । विष्णुदास नामा म्हणे । यु यु यु यु यु यु ॥१०॥