भजनी मालिका

भजने

केशव नाम गाय माधव नाम गाय । विठ्ठल नाम गाय कामधेनु ॥१॥ वेणुवादीं चरे पाणी पी भीवरें । ती गाय हंबरे भक्तालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम ॥१॥ माधव गोविंद सर्वशास्त्रीम आहे । उभारुनियां बाहे वेदु सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव पैं मुक्ति केशव पैं भक्ति । केशव विश्रांति पंढरीये ॥१॥ केशव लैकिकीं केशव व्यवहारीं । केशव निर्धारीं नाम तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव म्हणतां क्लेश जाताती परते । त्याहुनि सरतें आणिक नाहीं ॥१॥ वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी । उदंड वाचेसी हरी म्हणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव म्हणे नाम्या खंती वाटे माझ्या मनीं । निद्रा न लगे नयनीं पाहताम वाट ॥१॥ तुजविण उदास वाटे ही पंढरी । न पडे क्षणभरी विसरु तुझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव म्हणे नाम्या धन्य तुज फावलें । बरवें तुवां केलें आत्महित ॥१॥ पुण्यपावन तीर्थें पाहिलीं सकळिक । प्रक्षाळिलीं पातकें वासनेचीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव म्हणे नाम्या सुखाच्या निधाना । दे रे आलिंगना आवडत्या ॥१॥ जिवलगा जवळोनि नवजे कोठें दुरी । वाटे तुज अंतरीं घालावासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशव ह्मणतां जासी केशवपंथें । त्यांहूनि सरतें आ-णिक नाहीं ॥१॥ वेद कां पढसी शास्त्र कां सांगसी । उदंड वा-चसी हरी ह्मणतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥ संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवा माधवा गोविंदा गोपाळा । जेवी तूं कृपाळा पांडुरंगा ॥१॥ अच्युता वामना दशरथनंदना । जेवी तूं गा कृष्णा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥ विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

केशवाचे प्रतापें गोसावी होसी । दास्यत्व करोनि सर्वस्व पोशी ॥१॥ अर्जुनाचा सारथी बळीचा सांगाती । द्रौपदीच्या आकांतीं धांवोनि पावे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवाचें प्रेम नामयाचि जाणें । नाम्या ह्रदयीं असणें केशवातें ॥१॥ नामा तो केशव केशव तो नामा । अभिन्नत्व आम्हां केशवासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥ झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

केशवाच्या नामीं लागलेंसे ध्यान । देखिल्या नयन तदाकार ॥१॥ जया तया ह्मणे माझा चक्रपाणी । जाय लोटांगणीं सर्व भावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवापरता देव आणिक आहेती । ऐसें श्रुति स्मृति बोलतील ॥१॥ तरी ते शब्द झणीं कानीं हो पडती । पाखांडी ह्मणती सहावें तें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवासी नामा सांगतसे भावें । नफा वेवसाव जाला तैसा ॥१॥ मालिक गणोबा धोंडोबा जामीन । घेतलीसे पूर्ण निशाणचिठी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशवासी पाहे केशवासी ध्याये । केशवासी गाये सर्वकाळ ॥१॥ केशव पैं हाचि वृत्तीसहित मन । केशववासी ध्यान सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

केशिराजा आदि सकळा अनादी । तूंचि कृपानिधि नारायणा ॥१॥ अव्यक्ता अक्षरा सर्व अविनाशा । अगा पंढरीशा पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव