भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवासी पाहे केशवासी ध्याये । केशवासी गाये सर्वकाळ

keshavasi pahe keshavasi dhyaye | keshavasi gaye sarvakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवासी पाहे केशवासी ध्याये । केशवासी गाये सर्वकाळ ॥१॥ केशव पैं हाचि वृत्तीसहित मन । केशववासी ध्यान सर्वकाळ ॥२॥ सबाह्यअंतरीं सांडिना कोणासी । जाणों अंतरासी साक्ष भूत ॥३॥ नामा म्हणे तुम्हीं केशव होऊनि । पंढरीं पाटणीं नांद बापा ॥४॥