भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव म्हणे नाम्या खंती वाटे माझ्या मनीं । निद्रा न लगे नयनीं पाहताम वाट

keshav mhane namya khanti vate majhya manin | nidra na lage nayanin pahatam vat

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव म्हणे नाम्या खंती वाटे माझ्या मनीं । निद्रा न लगे नयनीं पाहताम वाट ॥१॥ तुजविण उदास वाटे ही पंढरी । न पडे क्षणभरी विसरु तुझा ॥२॥ डोळियां वेगळा नवजें कोठें दुरी । चित्त मजवरी ठेवुनि राहे ॥३॥ तुज माझी सवे मज तुझी आवडी । गुळासी न सोडी गोडी जैसी ॥४॥ तैसे तुम्ही आम्ही एकमेकांमाजीं । विचारिताम सहजीं दुजें नाहीम ॥५॥ येतया जातया पुसे तुझी गोष्टी । म्हणे माझें नामें दृष्टि पडिलें होतें ॥६॥ वाटे तहानभूक पीडिल्या जाणें कोण । एका मजविण गूज त्याचें ॥७॥ रात्रदिवस खेद करुनि आपुल्या जीवा । असेल माझा धांवा पोकारीत ॥८॥ मजवीण कोणाचिये साउलीं बैसेल । कोण त्या पूसेल शीणभागु ॥९॥ संपांपासीं सांगे शिणले मजविण । कंठीं धरिला प्राण मजलागीं ॥१०॥ धरुनीं हनुवटी दिधलें आलिंगन । कुरवाळोनी वदन नेत्र पुशी ॥११॥ मग काढोनी कंठीची सुमनतुळशीमाळा । घातलिसे गळां नामयाच्या ॥१२॥ सर्वांसुंदर पाहे कृपादृष्टी । पुसे जीवींची गोष्टी कृपासिंधू ॥१३॥ निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान खेचर । नरहरि सोनार आदिकरोनी ॥१४॥ समस्त भक्त मिळोनी लोटांगणीं येती । आलिंगन देती नामयासी ॥१५॥ अनिवार सुमनें वर्षती सुरवर । गगनीं जयजयकार शब्द होती ॥१६॥ ऋषिगण गंधर्व मिळोनि सकळिक । येती दृष्टिसुख घ्यावयासी ॥१७॥ रुक्माई आरती घेऊनी आली वेगें । ओंवाळिले दोघे देवभक्त ॥१८॥ कवतुकें नाम्याची धरिली हनुवटी । पाहे कृपादृष्टी घडिये घडिये ॥१९॥