भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवासी नामा सांगतसे भावें । नफा वेवसाव जाला तैसा

keshavasi nama sangatase bhaven | napha vevasav jala taisa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवासी नामा सांगतसे भावें । नफा वेवसाव जाला तैसा ॥१॥ मालिक गणोबा धोंडोबा जामीन । घेतलीसे पूर्ण निशाणचिठी ॥२॥ आठवडयाची बोली करूनियां आलों । नामा म्हणे धालों तुज पाहतां ॥३॥