भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवापरता देव आणिक आहेती । ऐसें श्रुति स्मृति बोलतील

keshavaparata dev anik aheti | aisen shruti smruti bolatil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवापरता देव आणिक आहेती । ऐसें श्रुति स्मृति बोलतील ॥१॥ तरी ते शब्द झणीं कानीं हो पडती । पाखांडी ह्मणती सहावें तें ॥२॥ इमद्रियांसि तुह्मी करा रे जतन । भजावा निधान श्रीविठ्ठल ॥३॥ छेदावया शिर हस्त सहस्रांचें । जरी बहूतांचे उगा-रिले ॥४॥ परि तूतें नाम आन न देवाचें । केशवापरतें कैंचें असे ब्रह्म ॥५॥ अंगें चतुरानना झालिया हो भेटी । तोहि जरी गोष्टी ऐसी करी ॥६॥ तरी तो चळला पोटीं ऐसें जाण । एकीं दुजेपण दावी तरी ॥७॥ ब्रह्मकटाह एक उल्लंघों शके ऐसा । वर्तोनि दाही दिशा वर्ते जरी ॥८॥ केशव नव्हे तो हो कां अनारिसा । म्हणोनियां वासा पाहों नक ॥९॥ व्यसन भक्ति विरक्ति प्रौढी पुरुषार्थ पांचवा । जीवा-चिया सेवा ना कां ॥१०॥ सर्वाभूतीं आहे केशव परमात्मा । न विसंबावें वर्मां नामा ह्मणे ॥११॥