भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥ ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दज्ञानें देवा नाश केला ॥१॥ आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥१॥ कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उशीर तो काय तुम्हांपाशीं ॥१॥ आहे तें मागतों दिसतें जवळी । केल्यामध्यें कळि कोण साध्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठें आम्ही आतां वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥१॥ न करावी सांडी आतां टाळाटाळी । दैन हे कळी होईल माझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥१॥ कोठें गुंतलासी भक्तीप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥१॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥१॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥१॥ हा गे हा गे हरी । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥ कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम