भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥ कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥ माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥ लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥ कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय आह्मीं आतां पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें कां करीतोसी चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परेपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें झालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥ कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय करतील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम