भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें

kay amhin kelen aisen | nuddharijesen sangaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥ गजा नाड्या सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥२॥ तुका म्हणे गणिका नष्ट । माझे कष्ट त्याहूनि ॥३॥