भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि

kay amhan chalavisi vayanvin | mhanasi durun dekhilasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥ लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥ होती दृष्टि आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥३॥ झालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गिळियेला वाचा धूर आगी ॥४॥ आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥५॥ भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका म्हणे ठावें नाहीं ज्ञान ॥६॥