भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक

kay unen amhan vithobache pai | nahin aisen kai yethen ek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥२॥ तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥३॥