भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे

kamatur chavi sandi | baral tondin barale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥ रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥ धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥२॥ तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥३॥