भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां

kay aisa janma java vanyanvin | kanhin tari run aso mathan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥ कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥ शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होईल दया ॥२॥ तुका म्हणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥३॥