भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥१॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हू दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हे चि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपै ॥१॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥ धीर उदारीं व निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि सर्वमुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥१॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥१॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हेचि माझें चित्ती । राहो आता भावप्रीती । विठ्ठल सुषुप्ती । जागृती स्वप्नासी ॥१॥ आणिक नाही मागणें । राज्यचाड संपत्ती धनें । जिव्हे सुख तेणें । घेता देई नाम तुझे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम