भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवला धीर

hen ton vatalen ashcharya | tumhan na dharavala dhir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवला धीर ॥१॥ माझा फुटतसे प्राण । धांव धांव म्हणऊन ॥ध्रु.॥ काय नेणों दिशा । झाल्या तुम्हांविण ओशा ॥२॥ तुका म्हणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥