भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा

hen chi yachya aisen magaven dan | vanduni charan narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥१॥ धीर उदारीं व निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥ हाचि होईजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभविल्या ॥२॥ जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥३॥ फावल्यामागें कां न घालावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥४॥ तुका म्हणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥५॥