भजनी मालिका
← भजनांकडे परत

हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा

hen ka amhan sevadan | dekhon sin vishamacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हें का आम्हां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥१॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कलीसारिखे ॥ध्रु.॥ शरणागत वैऱ्या हातीं । हे निश्चिंती देखिली ॥२॥ तुका म्हणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥३॥