वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज
vachanacha anubhav hatin | bolaviti dev maj
वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥ परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
vachanacha anubhav hatin | bolaviti dev maj
वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥ परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥
vachananche mande davave prakar | kay tya sachar kautukache
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥ जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥
vachanen chi vhaven apan udar | hoil vishvambhar sampushta chi
वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥
vachanen hi nad | na bole ten muken khod
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥ दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥
vanchuniyan pind | bhata dan kari land
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥ जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥
vatavat keli | na vicharitan mana ali
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥ मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥
vadilen dilen bhumidan | ten jo mage abhilasun
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥ अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥
vatsa pale dhenu dhanve pathilagin | priticha to angin ayurbhav
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥ शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥
vadavavi vani majhi krupavanta | vagapushpe santan samarpishi
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी ॥१॥ सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
vandilen vandaven jivachiye sathi | kinva bari tuti arambhin cha
वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥ स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥
vandin mi bhuten | atan avaghin chi samasten
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
vade vani pari durlabh anubhav | chalicha chi vaho bahutek
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंकितसे ॥ध्रु.॥
vade sakshatvensin vani | narayanin mishrit
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥ न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥
varata venghoni ghatali udi | kalambabudin yamunesi
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥ हरी बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥
varaten karoniyan tond | haka marito prachand
वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥
vari vari bola ras | kathi dnyan maji phos
वरी वरी बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥ ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥
varnavi te thori eka viththalachi | kirti manavachi sangon naye
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥
varnave te kiti | kele pavade shripati
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥ विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥
varnu mahima aisi nahin maj vacha | na bolave sacha par tujha
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥ ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥
varttatan vasar | kay karaven sharir
वर्त्ततां वासर । काय करावें शरीर ॥१॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥